चेन्नई : आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून आजच्या सामन्यापूर्वीच मोठी चुक झाली आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन हा नाणेफकीसाठी मैदानात आल्यावर ही मोठी चुक कोहलीकडून झाल्याचे पाहायला मिळाली आहे. नाणेफेकीच्यावेळी कोहली आणि संजू हे मैदानात आले होते. त्यावेळी विराटच्या हातमध्ये नाणे होते आणि त्याने ते उडवले. यावेळी संजूने 'टेल्स' असा आपला कल दिला, पण 'हेड्स' आलं आणि संजूने नाणेफेक गमावली. यावेळी विराट कोहली नाणेफेक जिंकला होता. पण विराटला ही गोष्ट समजलीच नाही. त्याला वाटलं की संजूनेच नाणेफेक जिंकली आहे. त्यामुळे कोहलीने सर्वप्रथम संजूचे नाणेफेक जिंकल्याबाबत अभिनंदन केले. त्याचबरोबर जो कर्णधार नाणेफेक जिंकतो त्यांना प्रथम बोलण्याची संधी मिळते. त्यासाठी कोहलीने यावेळी संजूला पुढे केले. कोहली नेमका काय करतो आहे, हो कुणालाही समजले नाही आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावेळी संजूही चक्रावला होता. कारण नाणेफेक त्याने गमावली होती, त्यामुळे आपण काय निर्णय घेतला, हे तो सांगू शकत नव्हता. पण काही वेळाने कोहलीच्या लक्षात ही मोठी चुक आली आणि त्याने यावेळी माझ्याकडून चुक झाल्याचे सांगितले. कोहली यावेळी म्हणाला की, " मी आतापर्यंत फार कमीवेळा नाणेफेक जिंकली आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत आज असं घडलं आहे. आतापर्यंत मला जास्तवेळा नाणेफेक जिंकता आली नाही, त्यामुळेच ही गोष्ट घडली आहे." विराटच्या डोक्यातूल नाणेफेकीच्या पराभवाचे भूत अजूनही उतरलेले दिसत नाही. कारण नाणेफेक जिंकल्यावरही त्याला आपल्याबाजूने कौल लागला असे वाटत नाही. त्यामुळे कोहलीकडून आजच्या दिवशी ही चुक झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला कोहली नेमकं काय करतो आहे, हे कोणालाही समजत नव्हते. पण अखेर ही आपली चुक आहे हे त्याच्याच लक्षात आले. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आजचा सामना रंगणार आहे. आरसीबीने आतापर्यंत तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत, त्यामुळे त्यांचा विजयरथ आरसीबीचा संघ रोखणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vcb3cp
No comments:
Post a Comment