मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला यावर्षी एक मॅचविनर खेळाडू मिळाला आहे. पण हा खेळाडू चेन्नईकडून खेळताना चमकदार कामगिरी करत असला तरी मात्र त्याला आपल्या देशाकडून खेळण्याची संधी मिळणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य एका खेळाडूने यावेळी केले आहे. धोनीच्या संघात एक मॅचविनर खेळाडू दाखल झाला आहे. आतापर्यंत त्याने चेन्नईला काही सामने जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर एखाद्या खेळाडूला आपल्या देशाकडून खेळण्याची संधीही मिळू शकते. पण या खेळाडूच्या बाबतीत मात्र असं होणार नाही, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनला वाटत आहे. पीटरसन यावेळी म्हणाला की, " चेन्नईच्या संघाकडून खेळताना यावर्षी इंग्लंडच्या मोइन अलीने दमदार कामगिरी केली आहे. पण या कामगिरीच्या जोरावर त्याला इंग्लंडच्या संघात स्थान मिळणार नाही. जर इंग्लंडच्या ट्वेन्टी-२० संघातील एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला किंवा एखाद्या खेळाडूला विश्रांती घ्यायची असेल तर त्याला इंग्लंडच्या संघात स्थान मिळू शकते, पण अन्यथा मोइनला इंग्लंडच्या संघाचे दरवाजे उघडू शकणार नाहीत." पीटरसन पुढे म्हणाला की, " चेन्नईकडून खेळताना मोइन हा फक्त चांगली गोलंदाजी करत नाही, तर त्याच्याकडून धडाकेबाज फलंदाजीही पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर त्याचे क्षेत्ररक्षणही चांगले झालेले आहे. मला मोइन हा एक खेळाडू म्हणून नक्कीच आवडतो. चेन्नईच्या संघात यापूर्वी सुरेश रैना हा तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करायचा, हे बरेच वर्षे आपण पाहिले आहे. पण यावर्षी मोइन अलीला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येत आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना तो मोक्याच्या क्षणी चेन्नईच्या संघाला विकेट्सही मिळवून देत आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाला यावेळी मोइनच्या रुपात एक चांगला खेळाडू गवसला आहे." यावर्षी झालेल्या लिलावात मोइनला चेन्नईच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यापूर्वी मोइन जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघात होता, तेव्हा त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण आता धोनीच्या नेतृत्वाखाली मोइनची कामगिरी चांगलीच बहरली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nvceRP
No comments:
Post a Comment