मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात काल झालेल्या सामन्यात आजवर कधीही न झालेली गोष्ट घडली. कोलकाता नाइट रायडर्स आणि यांच्यातील या सामन्यात याने अशी कामगिरी केली जी आजवर कधीच केली नव्हती. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आयपीएलमध्ये अनेक शानदार खेळी करताना पाहिले आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो की अंतिम षटकात विजय मिळून देण्याची कौशल्य...पण कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये आजवर कधीच जमले नाही अशी कामगिरी केली. वाचा- कोलकाताविरुद्ध ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसीस यांनी शानदार सुरूवात करून दिली. शतकी भागिदारीनंतर मोइन अली आला. त्याने २५ धावा केल्या. मोइन अली बाद झाल्यानंतर सुरेश रैना ऐवजी फलंदाजीला आला. धोनीने १७व्या षटकातील ५व्या चेंडूवर चौकार मारला. हा चौकार त्याने सुनील नरेनच्या चेंडूवर मारला. याासाठी धोनीला तब्बल ६५ चेंडू वाट पाहावी लागली. याआधी आयपीएलमध्ये धोनीला सुनील नरेनच्या चेंडूवर कधीच चौकार मारता आला नव्हता. या सामन्यात चेन्नईने फाफच्या नाबाद ९५, गायकवाडच्या ६४ धावांच्या जोरावर २० षटकात २२० धावा केल्या. उत्तरादाखल कोलकाताच्या आघाडीचे ५ फलंदाज ३१ धावात माघारी परतले. त्यानंतर रसेल, कार्तिक आणि कमिन्स यांनी तुफान फलंदाजी केली. अखेर चेन्नईने ही लढत १८ धावांनी जिंकली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32IIJlz
No comments:
Post a Comment