नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज विरुद्ध यांच्यात लढत होणार आहे. हंगामातील पहिल्या लढतीत पराभव झाल्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार सामन्यात विजय मिळवला. तर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत हैदराबादला एकच विजय मिळवता आलाय. वाचा- गुणतक्त्यात चेन्नई दुसऱ्या स्थानावर तर हैदराबादचा संघ अखेरच्या स्थानावर आहे. या दोन्ही संघातील आजच्या लढतीत बदल होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काही खेळाडूंची खराब कामगिरी होय. गेल्या वर्षी रुळावरून खाली घसरलेली चेन्नई एक्स्प्रेस यावर्षी पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसतय. आजच्या लढतीत धोनी रॉबिन उथप्पाला अंतिम ११ मध्ये स्थान देऊ शकतो. तो अंबाती रायडूच्या जागा घेऊ शकले. मोईन अली फिट झाला तर ब्राव्होच्या तो संघात असेल. दिल्लीच्या खेळपट्टीचा विचार करता धोनी ब्राव्होला संधी देऊ शकतो. इमरान ताहीरला आणखी एक संधी मिळू शकते. वाचा- सनरायझर्स हैदराबादचा विचार केल्यास कर्णधार डेव्हिड वॉर्नर विदेशी खेळाडूंमध्ये कोणताही बदल करणार नाही. विराट सिंहच्या जागी मनीष पांडेला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. गेल्या दोन सामन्यात तो बाहेर आहे. केदार जाधवला या सामन्यात देखील संधी मिळेल. अब्दुल समद हा एक उत्तम फिनिशर असल्याने त्याचा विचार केला जाऊ शकतो. भुवनेश्वर कुमार फिट आहे का यावर त्याचे स्थान ठरले. वाचा- संभाव्य संघ हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनिष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, जगदीश सुचित, खलिल अहमद, सिद्धार्थ कौल चेन्नई- ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, ब्राव्हो, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम करन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sWG4PV
No comments:
Post a Comment