नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघात एक मोठा बदल केला. यावेळी कोहलीने भारतीय संघातील एका महत्वाच्या खेळाडूला संघाबाहेर काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असेल. कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला आम्ही खेळवणार नसल्याचे सांगितले. सुंदर या सामन्यात वगळण्यात आले असून त्याच्याजागी संघात शाहबाझ अहमदला संधी देण्यात आली आहे. आरसीबीने आजच्या सामन्यात हा एक बदल केला. पण पंजाब किंग्सच्या संघाने आजच्या सामन्यासाठी तीन बदल केल्याचे पाहायला मिळाले. पंजाबच्या संघाने आजच्या सामन्यात मयांक अगरवाल, मोइझेज हेनरिक्स आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या तिघांच्या जागी पंजाबच्या संघात हरप्रीत ब्रर, रिली मेडरिथ आणि प्रभसिमरन सिंग यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता हे तिन्ही खेळाडू या संधीचे सोने करतात का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. विराट कोहली आणि लोकेश राहुल या दोन मित्रांच्या नेतृत्वाखालील संघात आजचा सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या साामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो आणि गुणतालिकेत कितवे स्थान पटकावतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. आरसीबीचा संघ आजचा सामना जिंकून अव्वल स्थानावर जाण्याची प्रयत्नशील असेल. त्यामुळे पंजाब आणि आरसीबी यांच्यातील सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nBnQCP
No comments:
Post a Comment