नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात काही चुका केल्या आणि त्या चुका संघाला चांगल्याच भोवल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. राजस्थानच्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. गोलंदाजी हे मुंबई इंडियन्सच्या संघाचे बलस्थान होते. पण आजच्या सामन्यात मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर सुरुवातीला चांगलाच प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांना या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंडने यावेळी संघाबाबत चिंता व्यक्त केली. शेनने सामना सुरु असताना सांगितले की, " पहिल्या काही षटकांमध्ये मुंबई इंडियन्सला काही चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही." पहिल्या सहा षटकांमध्ये यावेळी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना एकही विकेट मिळवता आली नव्हती. यावेळी राजस्थानच्या सलामीवीरांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला होता. पहिल्या सहा षटकांमध्ये राजस्थानचा संघ जवळपास १०च्या सरासरीने धावा जमवत होता. पण मुंबई इंडियन्सला मात्र पहिल्या सहा षटकांमध्ये एकही यश मिळवता आले नव्हते. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सची फलंदाजी हा चिंतेचा विषय होता, पण या सामन्यात संघाची गोलंदाजी ही डोकेदुखी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई इंडियन्ससाठी यावेळी फिरकीपटू राहुल चहर हा यशस्वी ठरला. कारण राहुलने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत मुंबई इंडियन्सच्या संघाला दुहेरी यश मिळवून दिले होते. पण राहुलचा आपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या एकाही गोलंदाजाला १६ षटकांपर्यंत तरी यश मिळवता आले नव्हते. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे बलस्थान असलेल्या गोलंदाजीवर राजस्थानच्या फलंदाजांनी जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या सामन्यात तरी मुंबई इंडियन्सचा संघ जिंकणार का, ही चिंता त्यांच्या चाहत्यांना सतावत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ विजय मिळवणार की राजस्थान त्यांच्यावर मात करणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e3WwJW
No comments:
Post a Comment