मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील १९व्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर शानदार विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. आयपीएलच्या या हंगामातील आरसीबीचा हा पहिलाच पराभव ठरला. तर धोनीच्या सीएसकेने विजयाचा चौकार मारला. वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूने सलग चार सामन्यात विजय मिळवाल होता. तर चेन्नईने दिल्ली विरुद्धच्या पहिल्या लढतीत पराभव स्विकारल्यानंतर सलग तीन विजय मिळवले होते. आजचा सामना सुरू होण्याआधी चेन्नई दुसऱ्या तर बेंगळुरू पहिल्या स्थानावर होते. पण चेन्नईने रविंद्र जडेजाच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. वाचा- या विजयासह चेन्नईने पाच पैकी चार सामन्यात विजय मिळून ८ गुण आणि प्लस १.६१२ नेट रनरेटसह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. तर या हंगामातील पहिल्या पराभवानंतर बेंगळुरू ८ गुण आणि प्लस ०.०९६ रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या डबल हेडरमधील दुसरी लढत खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ तिसऱ्या स्थानावर, तर गतविजेते मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहेत. पंजाब किंग्ज पाचव्या, राजस्थान रॉयल्स सहाव्या, सनरायझर्स हैदराबाद सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्स आठव्या स्थानावर आहे. सर्वाधिक धावा करणारे फलंदाज १) शिखर धवन २) केएल राहुल ३) फाफ डुप्लेसिस ४) रोहित शर्मा ५) ग्लेन मॅक्सवेल सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज १) हर्षल पटेल २) राहुल चहर ३) ख्रिस मॉरिस ४) आवेश खान ५) दीपक चहर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QUaUvw
No comments:
Post a Comment