मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील १९व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने विरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्या लढतीतील पराभवानंतर सलग तीन लढतीत विजय मिळवला आहे. तर विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीने सलग पाच विजय मिळवले आहेत. वाचा- आरसीबीच्या लढतीआधी चेन्नई सुपर किंग्जला दोन धक्के बसले. पहिल्या चारही लढतीत चांगली कामगिरी करणाऱ्या मोइन अली फिट नसल्यामुळे संघाबाहेर जाला आहे. त्याच बरोबर लुंगी एगिडी देखील संघात नाही. या दोन खेळाडूंच्या जागी धोनीने ब्राव्हो आणि इम्रान ताहीर यांना जागा दिली आहे. वाचा- चेन्नई प्रमाणेच बेंगळुरू संघाला देखील दोन बदल केले आहेत. डॅनिअल ख्रिस्टिन आणि नवदीप सैनी या दोघांचा संघात समावेश केला आहे. आज जर आरसीबीने ही मॅच जिंकली तर आयपीएलच्या इतिहासात सलग पाच सामने जिंकणारा तो तिसरा संघ ठरेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aDjq8S
No comments:
Post a Comment