चेन्नई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पंजाबविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजांना एक मंत्र दिला होता. त्यामुळेच फिरकीपटू जयंत यादव यावेळी अचूक गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला. मात्र रोहितच्या या मंत्रानंतही कृणाल पंड्या हा अपयशीच ठरलेला दिसला. मुंबई इंडियन्सेने मोठी धावसंख्या उभारली नसली तरी यावेळी जयंत आणि राहुल चहर यांनी तिखट गोलंदाजी केली. जयंतने यावेळी तर पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला चांगलेच चेंडू खेळवले. पण यावेळी नशिब जयंतच्या बाजूने नव्हते, नाहीतर जयंतला यावेळी गेलला बळी मिळता आला असता आणि सामन्याचा निर्णय कदाचित वेगळा लागला असता. रोहितच्या एका मंत्रामुळे जयंतची ही गोलंदाजी आणखीनच बहरल्याचे पाहायला मिळाले. जयंत जेव्हा गेलसमोर गोलंदाजी करत होता, तेव्हा तो थोडा दडपणाखाली असल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा रोहितने त्याला एक मंत्र दिला. रोहित यावेळी म्हणाला की, " चेंडू हा चांगलाच वळतो आहे आणि याचा फाया तुला होऊ शकतो. त्यामुळे चेंडूची दिशा आणि टप्पा योग्य ठेव. तुझ्या चेंडूवर मोठा फटका मारायला गेल्यावर फलंदाज बाद होऊ शकतो, त्यामुळे बिनधास्त गोलंदाजी कर." जयंतने यावेळी कर्णधार रोहितची ही गोष्ट ऐकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच जयंतने आपल्या चार षटकांमध्ये फक्त २० धावा दिल्या. पण रोहितचा हा मंत्र कृणाल पंड्याला मात्र अंमलात आणता आला नाही. कारण कृणालला यावेळी जयंत किंवा राहुल चहरसारखी चांगली गोलंदाजी करता आली नाही. कृणालने यावेळी आपल्या तीन षटकांमध्ये ३३ धावा दिल्याचे पाहायला मिळेल. मुंबई इंडियन्सच्या संघाला पंजाबविरुद्धच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबई इंडियन्सने यावेळी १३१ धावाच केल्या. धावसंख्या कमी असली तरी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. या जोडीने संघाला १००च्या पुढे नेले. ही जोडी पुन्हा एकदा रवी बिश्नोईने फोडली. त्याने सूर्यकुमारला ३३ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक करणारा रोहित शर्मा ६३ धावांवर माघारी परतला. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले. पण मुंबईचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gyiIh1
No comments:
Post a Comment