चेन्नई : मुंबई इंडियन्सची फलंदाजी हा चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. कारण आतपर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या या अपयशी फलंदाजीवर फलंदाज सूर्यकुमार यादवने एक मोठे वक्तव्य केले आहे. रोहित शर्माने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले असले तरी त्यांना १३१ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फलंदाज हे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहेत. या अपयशी फलंदाजांबाबत सूर्यकुमार यादवने आपले मत व्यक्त केले आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबाबत सूर्यकुमार म्हणाला की, " मुंबई इंडियन्सचा संघ हा मधल्या फळीतील फलंदाजीमुळे चिंतेत नाही. मुंबई इंडियन्सचे फलंदाज हे दर दिवशी नेट्समध्ये सराव करत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी हे फलंदाज आपल्या सरावावर अथक मेहनत घेत आहेत. माझ्यामते हा फक्त एका सामन्याचा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सचा प्रत्येक खेळाडू हा आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना सध्याच्या घडीला यश येताना दिसत नाही. खेळामध्ये अशा गोष्टी होत असतात. पण मला पूर्ण विश्वास आहे की, हे खेळाडू दमदार पुनरागमन करतील आणि त्यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळेल." मुंबई इंडियन्सचे पराभव का होत आहेत, पाहा...आतापर्यंत हार्दिक आणि कृणाल या दोन्ही पंड्या बंधूंना आतापर्यंत एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. संघाला गरज असताना या पंड्या बंधूंना एकाही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, हे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी चिंतेची बाब असेल. कृणाल हा गोलंदाजी करतो, तिथे तो काही धावा वाचवू शकतो किंवा विकेट्सही मिळवू शकतो. पण हार्दिक गोलंदाजीही करत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी गेल्या पाच सामन्यांमध्ये हार्दिक सातत्याने अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळत आहे. मधल्या फळीतील इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांच्याकडूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. इशात हादेखील सातत्याने अपयशी ठरतो आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात तर इशानला बढती देण्यात आली होती. पण या संधीचे सोने इशानला करता आलेले नाही. आतापर्यंतच्या पाचही सामन्यांमध्ये इशान हा एक फलंदाज म्हणून अपशी ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QXJq7W
No comments:
Post a Comment