चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात केकेआरला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण या सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनला आणखी एक धक्का बसला आहे. कारण मॉर्गनने या सामन्यात एक नियम मोडल्याचे पाहायला मिळाला आहे. चेन्नईच्या फलंदाजांनी यावेळी केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि २२० धावांचा डोंगर उभारला. पण यावेळी केकेआरची गोलंदाजी हाताळत असताना मॉर्गनकडून मोठी चुक झाली आणि त्याचा फटका मॉर्गनला यावेळी बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण केकेआरच्या संघाने काल संथगतीने गोलंदाजी केली आणि त्यामुळेच मॉर्गनला दंड भरावा लागणार आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात संथगतीने गोलंदाजी केल्याबद्दल केकेआरचा कर्णधार मॉर्गनवर आता आयपीएलच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. मॉर्गनकडून पहिल्यांदाच ही चुक घडली असून त्याला १२ लाख रुपयांचा दंड यावेळी भरावा लागणार आहे. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये मॉर्गनला जपून राहावे लागणार आहे. कारण पुन्हा अशा चुका होत राहिल्या तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही येऊ शकते. काय आहे आयपीएलचा नियम, जाणून घ्या...कोणत्याही संघाकडून पहिल्यांदा संथ गोलंदाजीची चुक घडली तर कर्णधाराच्या मानधनातून १२ लाख एवढी रक्कम दंड स्वरुपात आकारली जाते. त्यानंतर जर हीच चुक पुन्हा एकदा घडली तर कर्णधाराला २४ लाखांचा दंड ठोठावला जातो आणि त्याचबरोबर संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून सहा लाख रुपये किंवा मानधनाच्या २५ टक्के यांच्यामधील जी रक्कम कमी असेल, तेवढा दंड ठोठावला जातो. जर एखाद्या संघाकडून जर तिसऱ्यांदा षटकांची गती संथ राखण्याचीी चुक घडली तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी येते आणि त्याला ३० लाख रुपयांचा दंड भरावा लागतो. त्याचबरोबर कर्णधार वगळता अन्य खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा मानधनाच्या ५० टक्के यांच्यामधील जी रक्कम कमी असेल, तेवढा दंड ठोठावला जातो. जर संघाला आपल्या कर्णधारावरील बंदी आणू द्यायची नसेल तर त्यांना नेतृत्व बदलावे लागते. पण त्याबाबतचे पत्र त्यांना बीसीसीआयला द्यावे लागते आणि बीसीसीआयने या गोष्टीला परवानगी दिल्यावरच कोणत्याही संघाला आपला कर्णधार बदलता येऊ शकतो आणि त्याच्यावरील बंदीची तलवार येऊ शकत नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dCKKpU
No comments:
Post a Comment