नवी दिल्ली: vs Preview पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर गेल्या चार लढतीत शानदार कामगिरी करणाऱ्या संघाची आयपीएलच्या १४व्या हंगामात आज विरुद्ध लढत होणार आहे. ही लढत दिल्लीच्या अरुण जेठली मैदानावर होणार असून या हंगामात दिल्लीच्या मैदानावर होणारी ही पहिली लढत आहे. वाचा- महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची पहिली लढत गमावली होती. त्यानंतर सलग चार लढतीत त्यांनी विजय मिळवून गुणतक्यात दुसरे स्थान मिळवले आहे. इतक नव्हे तर चेन्नईची सरासरी अन्य सर्व संघांपेक्षा सर्वाधिक आहे. आज हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून विजय रथ पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वाचा- ... आयपीएलचे ३ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नईसाठी २०२०चे हंगाम खराब ठरले होते. पण यावेळी संघात अनुभवी खेळाडू आहेत. ऑलराउंडर रविंद्र जडेजाने आरसीबी विरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने अखेरच्या षटकात ३७ धावा केल्या, नंतर गोलंदाजीत ३ विकेट आणि एक धावबाद देखील केला होता. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस शानदार फॉर्ममध्ये आहेत. तर सुरेश रैना आणि अंबाती रायडू मोठी धावसंख्या करू शकतात. चेन्नईच्या फलंदाजांसाठी राशिद खान हे मोठे आव्हान असेल. पण हैदराबादचे अन्य गोलंदाज फार चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाहीत. फलंदाजीमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो आणि केन विलियमसन यांच्यावर सर्व काही अवलंबून आहे. हैदराबाद संघातील भारतीय खेळाडूंची कामगिरी हा काळजीचा विषय आहे. कर्णधार वॉर्नरला देखील खराब फॉर्ममधून बाहेर यावे लागले. त्याला चेन्नईचा गोलंदाज दीपक चहर, इम्रान ताहीर, जडेजा आदी गोलंदाजांचा सामना करायचा आहे. संभाव्य संघ हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, विराट सिंह/मनिष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव/अब्दुल समद, राशिद खान, जगदेश सुचित, खलिल अहमद/भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल चेन्नई- ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, मोइन खान/ब्राव्हो, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा/अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम करन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nsekle
No comments:
Post a Comment