चेन्नई : सध्याच्या घडीला भारतामध्ये करोनामुळे भयंकर अवस्था आहे. कुठे औषधांची कमतरता जाणवते आहे, तर ऑक्सिजनचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएख अख्तरलाही आता चिंता वाटयला लागली आहे. शोएबने आपली चिंता आता एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली असून त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शोएबने आपल्या व्हिडीमध्ये म्हटले आहे की, " सध्याच्या घडीला भारतामध्ये भयंकर अवस्था आहे. महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली आणि भारताच्या बऱ्याच भागांमधून करोनाचे दिवसाला लाखो रुग्ण सापडत आहे. ही गोष्ट आटोक्यात आणणे कोणत्याही सरकारसाठी शक्य नसल्याचेच सध्याच्या घडीला दिसत आहे. सध्याच्या घडीला भारतामध्ये ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे यावेळी आपण एकमेकांना सहकार्य करायला हवे. मी पाकिस्तानच्या सरकारलादेखील ही गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे या कठिण प्रसंगामध्ये आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे." आतापर्यंत शोएबला बऱ्याचदा भारतीयांनी ट्रोल केले आहे. पण या कठीण प्रसंगात शोएबला भारताबाबत चिंता वाटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतामधील लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचायला हव्यात, यासाठी शोएबने हा व्हिडीओ बनवल्याचे पाहायला दिसत आहे. करोनातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकर काय मदत करणार, पाहा...सचिनने आपल्या वाढदिवशी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिनने आपण प्लाझ्माचे दोन करणार असल्याचे सांगितले आहे. सचिनने आपल्या या व्हिडीओमध्ये सांगितले की, " मला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. पण त्यावर मी आता मात केली आहे. मी २१ दिवस विलगीकरणामध्ये होतो आणि त्यावेळी मला तुमच्या शुभेच्छांचा फायदा झाला. त्याचबरोबर डॉक्टरांनी माझ्यावर चांगले उपचार केले. त्यानंतर डॉक्टरांनी मला एका गोष्टीची विनंती केली आणि तिच गोष्ट मी आता करणार आहे. मी आता प्लाझ्मा देणार आहे आणि तुम्हीही याचे दान करायला हवे. कारण जर करोनाबाधित रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळाला तर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट करणे फार महत्वाचे आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pp0eog
No comments:
Post a Comment