मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या काही खेळाडूंनी आयपीएलला सोडचिठ्ठी दिली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथसारखे खेळाडूही आयपीएल सोडणार असल्याचे वृत्त कानावर आले होते. पण ऑस्ट्रेलियामध्ये असं नेमकं झालंय तरी काय, की जेणेकरुन या खेळाडूंना लवकर आपल्या मायदेशी परतायचे आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने करोनाच्या काळात काही कडक नियम बनवले आहेत. सध्याच्या घडीला १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या कुठल्याही विमानांना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आयपीएल ही मे महिन्यापर्यंत चालणार आहे. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्या देशात प्रवेश मिळणार की नाही, हा प्रश्न सध्याच्या घडीला ऐरणीवर आहे. जर खेळाडूंना प्रवेश दिला जाणार नसेल तर आयपीएल संपेपर्यंत हे खेळाडू थांबणार नसल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल सोडणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये भारतातील विमानांना प्रवेशबंदी आहे, पण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आता खेळाडूंवर मात्र बंदी आणण्यात येणार नसल्याचे समजते आहे. त्यामुळे खेळाडू आता संपूर्ण आयपीएल खेळू शकतात, असे म्हटले जात आहे. पण त्यांचे लक्ष ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या निर्णयांवर नक्कीच असेल. कारण जर काही निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सरकारला घ्यावे लागले, तर आपण भारतामध्येच राहायचे की मायदेशात परतायचे, हा निर्णय खेळाडूंना घ्यावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघातही आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ख्रिस लीन या खेळाडूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की त्यांनी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी चार्टर विमानाची सोय करावी. लीन म्हणाला, "या संदर्भात मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक पत्र लिहले आहे. खेळाडू प्रत्येक वर्षी कराराच्या माध्यमातून १० टक्के पैसे कमावतात. आमच्याकडे या पैशाचा या वर्षात वापर करण्याची संधी आहे. जेव्हा ही स्पर्धा संपेल तेव्हा चार्टर विमानाची सोय करावी. मला कल्पना आहे की असे लोक आहेत ज्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा अधिक वाइट आहे. पण आमचे बायो बबल देखील खुप कडक आहे. पुढील आठवड्यात आम्हाला कोव्हिडची लस मिळण्याची शक्यता आहे. तरी देखील आम्हाला आशा आहे की, सरकार एका खासगी चार्टर विमानाची व्यवस्था करेल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xB7E9h
No comments:
Post a Comment