मुंबई: आयपीएलमधील १४व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९१ धावा केल्या. चेन्नईकडून फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर बेंगळुरूकडून हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्या. जडेजाने अखेरच्या काही षटकात वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक झळकावले. वाचा- मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन बदल केले. चेन्नईत मोइन अली आणि लुगी एगिडीच्या जागी ब्राव्हो आणि इम्रान ताहीर यांचा समावेश केला गेला. वाचा- ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७४ धावा केल्या. ऋतुराज २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रैनाने फाफसह संघाचे शतक पूर्ण करून दिले. पण १११ धावांवर प्रथम रैना वैयक्तीक २४ धावांवर तर फाफ ५० धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था ३ बाद १११ अशी झाली. अंबाती रायडूला देखील फार मोठी धावसंख्या करता आली नाही. तो ७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकात जडेजाच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटाकत १९१ धावा केल्या. जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारले आणि चेन्नईला या सामन्यात मोठी आघाडी मिळून दिली. त्याने २३ चेंडूत अर्धशतक केले. आरसीबीकडून पटेलने २०वे षटक टाकले आणि जडेजाने या षटकात ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महाग षटक ठरले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sRYLo1
No comments:
Post a Comment