मुंबई: मध्ये राजस्थान रॉयल्सची सुरूवात फार चांगली झालेली नाही. एका बाजूला संघाचा पराभव होत असताना दुसऱ्या बाजूला महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर होत आहे. दुखापतीमुळे बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएल बाहेर झाल्यानंतर आता राजस्थान तसेच कर्णधार संजू सॅमसन यांना आणखी एक वाइट बातमी मिळाली आहे. वाचा- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड ()ने शुक्रवारी जाहीर केले की वेगवान गोलंदाज आयपीएल २०२१ मध्ये खेळू शकणार नाही. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे भारत दौऱ्यानंतर इंग्लंडला परत गेला होता. जोफ्रा सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही असे म्हटले जात होते. पण आता तो आयपीएलचा १४वा हंगाम खेळू शकणार नाही असे ईसीबीने स्पष्ट केले. वाचा- जोफ्रा पुढील आठवड्यात गोलंदाजीचा सराव करणार आहे. ईसीबी आणि निवड समिती त्याच्या सरावावर लक्ष ठेवणार आहेत. जोफ्रा पुढील आठवड्यात ससेक्स संघासोबत सराव सत्र सुरू करेल. पुढील १५ दिवसात तो क्रिकेट खेळू शकेल. जर या काळात त्याला त्रास झाला नाही तर तो गोलंदाजीचा सराव सुरू करेल. वाचा- गेल्या आठवड्यात आर्चरला सराव करण्याची परवानगी दिली नव्हती. २९ मार्च रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आयपीएलमधील संघाला तो हंगामातील दुसऱ्या सत्रात उपलब्ध होईल असे वाटले होते. पण आता ताज्या बातमीमुळे राजस्थानला मोठा धक्का बसलाय. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3azcji6
No comments:
Post a Comment