चेन्नई : मुंबई इंडियन्सचा यापुढचा सामना उद्या पंजाब किंग्स या संघाबरोबर होणार आहे. पण पंजाबी दोन हात करण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला एक मोठी चिंता सतावते आहे. मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने या सामन्यापूर्वी चिंता बोलून दाखवली आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यावेळी म्हणाला की, " उद्या आमचा सामना पंजाब किंग्सबरोबर होणार आहे. पण यावेळी एक चिंता सतावत आहे आणि ती म्हणजे पंजाबकडे फार चांगले फलंदाज आहेत आणि त्यांचा सामना करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. कारण लोकेश राहुल आणि ख्रिस गेलसारखे धडाकेबाज फलंदाज पंजाबच्या संघाकडे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मधल्या फळीतही चांगली फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांना गोलंदाजी करणे नक्कीच सोपे नाही." बोल्ट पुढे म्हणाला की, " लोकेश राहुल जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो जगातला आघाडीचा फलंदाज असतो. कारण फॉर्ममध्ये असल्यावर त्यांच्याकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे त्याचे आव्हान असेल. त्याचबरोबर ख्रिस गेलसारखा अनुभवी खेळाडू पंजाबकडे आहे. आतापर्यंत गेलने एकहाती सामनेही फिरवलेले आहेत. त्यामुळे गेलला गोलंदाजी करणे हे कधीच सोपे नसते." सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर असलेला डेव्हिड मलान हा पंजाबच्या संघात आहे. आतापर्यंत मलानने स्फोटक फलंदाजी करत गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले आहे. त्यामुळे मलान या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. डेव्हिड मलानबाबत बोल्ट यावेळी म्हणाला की, " मी मलानविरुद्ध जास्त सामने खेळलेलो नाही. पण गेल्यावेळी जेव्हा मलानविरुद्ध खेळत होतो तेव्हा त्याने शतक झळकावले होते. मलान हा एक स्फोटक फलंदाज आहे आणि त्याला रोखे हे फार कठीण काम आहे. कारण मलान एकदा फटकेबाजी करायला लागले की, त्याला गोलंदाजी करणे सोपे नसते. एकंदरीत पंजाबची फलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. कारण त्यांच्याकडे चांगले अनुभवी आणि स्फोटक फलंदाज आहेत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3niaCdR
No comments:
Post a Comment