मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलने स्फोटक फलंदाजी केली. त्याने २२ चेंडूत ५४ धावा केल्या. यात ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट २४५.४५ इतका होता. वाचा- चेन्नईने विजयासाठी २२१ धावांचे आव्हन दिले होते. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची अवस्था ५ बाद ३१ अशी झाली होती. ही मॅच केकेआर जिंकू शकत नाही यात कोणालाही शंका नव्हती. पण आणि दिनेश कार्तिक यांच्यात मनात वेगळच काही सुरू होते. रसेलने चेन्नईच्या गोलंदाजांची अशी काही धुलाई केली की सामन्याचे चित्र काही ओव्हरमध्ये बदलले. वाचा- रसेलने आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने २० चेंडूत ५० धावा केल्या. रसेलचे वादळ थांबणार नाही असे वाटत असताना सॅम करनच्या एका चेंडूवर तो बोल्ड झाला. वाचा- ज्या पद्धतीने रसेल बाद झाला त्यावर त्याला स्वत:ला विश्वास बसला नाही. रसेलला विश्वास होता की या सामन्यात तो संघाला विजय मिळवून देईल. बाद झाल्यानंतर तो फार निराश झाला आणि पॅव्हेलियनच्या पायऱ्यांवर जाऊन बसला. रसेल पॅव्हेलियनच्या आत गेला नाही. पायऱ्यांवर बसून मैदानाकडे बराच वेळ बसला होता. या घटनेच्या व्हिडिओ आणि फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xir6HF
No comments:
Post a Comment