चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या संघाला गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघात येत्या काही सामन्यांमध्ये मोठे निर्णय घेतले जातील. पण आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांमध्ये अपयशी ठरेलल्या दिग्गज खेळाडूला वगळण्याचा मोठा निर्णय मुंबई इंडियन्सचा संघ घेणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. खासकरून हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंना आतापर्यंत एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्स आतापर्यंत मोठी धावसंख्या गाठू शकलेला नाही. कायरन पोलार्डने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती खरी, पण त्याला आजच्या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयश आहे. इशान किशनही आतापर्यंत अपयशी ठरत आलेला आहे. आजच्या सामन्यात इशान जास्त काळ खेळपट्टीवर थांबला खरा, पण त्याला ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशी फलंदाजी करता आली नाही. आजच्या सामन्यात इशान किशनने २८ चेंडूंत २६ धावा केल्या होत्या. कृणाल फलंदाजी जरी चांगली करत नसला तरी तो गोलंदाजीमध्ये बऱ्यापैकी कामगिरी करतो आहे. त्याचरोबर त्याचे क्षेत्ररक्षणही चांगले होताना दिसत आहे. पण हार्दिक हा सातत्याने फलंदाजीमध्ये अपयशी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघालेल्या नाहीत. त्याचबरोबर दुखापतीमुळे तो गोलंदजीही करताना दिसत नाही. त्यामुळे हार्दिक पंड्याला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सचा संघ घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई इंडियन्ससाठी हा एक मोठा निर्णय असेल, कारण आतापर्यंत त्यांनी असा निर्णय घेतलेला नाही. पण यामुळे हार्दिकालही विश्रांती मिळेल आणि एका नव्या फलंदाजाला आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे पुढच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात नेमका काय बदल करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सला एकाही सामन्यात १६० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. मुंबई इंडियन्सची फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. यामध्ये सुधारणा झाली तरच मुंबई इंडियन्स विजय मिळवू शकते. पण या चुका सुधारल्या गेल्या नाहीत तर मुंबई इंडियन्सचा संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचणे कठीण होऊन बसू शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हे कठोर पाऊल उचलणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xdzNCY
No comments:
Post a Comment