दुबई : भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात आयसीसी होणार असून करोनामुळे त्याच्या आयोजनावर शंकेचे ढग तयार झाले आहेत. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. आता टी-२०च्या आयोजनावर देखील असेच प्रश्न निर्माण होत आहेत. वाचा- डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी युएईला स्टॅडबाय ठेवले आहे. जर करोनामुळे भारतात वर्ल्डकप आयोजनात अडचणी आल्या तर ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाईल. अर्थात टी-२० वर्ल्डकपसाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. वाचा- २०२१चा टी-२० वर्ल्डकप नियोजनानुसार २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणार होता. करोना व्हायरसमुळे तो भारतात २०२१ मध्ये आयोजित करण्याचे निश्चित केले. युएईमध्ये भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे तेथे स्पर्धेचे आयोजन करणे शक्य आहे. क्रिकेट बोर्डाचे आणि बीसीसीआयचे संबंध चांगले आहेत. गेल्या वर्षी आयपीएलच्या १३व्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eC4Z6q
No comments:
Post a Comment