मुंबई : भारतामध्ये सध्याच्या घडीला करोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याची चिंता सर्वांनाचा आहे. याबाबत आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे एक मोठे विधान केले आहे. बीसीसीआयचे अधिकारी धीरज मल्होत्रा यांनी यावेळी सांगितले की, " भारतामध्येच ट्वेन्टी-२० विश्वचषक होईल, अशी आशा आम्हाला आहे. आम्ही भारतातील परिस्थिती पाहत आहोत, त्याच्यावर नजर ठेवूनही आहोत. त्याचबरोबर आम्ही आयसीसीच्या संपर्कातही आहोत. त्याचबरोबर जर भारतामध्ये विश्वचषक होऊ शकला नाही तर त्याचा पर्यायही आम्ही शोधला आहे." मल्होत्रा यांनी पुढे सांगितले की, " भारतामध्ये जर ट्वेन्टी-२० विश्वचषक होऊ शकला नाही, तर त्याच्या पर्यायाचा आम्ही विचार केला आहे. आम्हाला सध्याच्या घडीला संयुक्त अरब अमिराती (युएई) हे सर्वांत चांगले स्थान वाटत आहे. पण हा विश्वचषक बीसीसीआयद्वाराच आयोजित केला जाईल, अशी आशाही आम्हाला आहे. आम्ही हा विश्वचषक युएईमध्ये खेळवण्यासाठी विचार करत आहोत, पण यावेळी विश्वचषकाचे यजमानपद हे बीसीसीआयकडेच असेल. " भारतामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन हे १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार होते. पण भारतामध्ये आता करोनामुळे भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे काही देशांनी हा विश्वचषक भारतामध्ये खेळवून नये, याबाबत आयसीसीला सांगितले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयदेखील हा विश्वचषक अन्यत्र कुठे खेळवण्यात येईल, याबाबतही विचार करत आहेत आणि यामध्ये आता युएईचा एक पर्याय समोर आला आहे. गेल्यावर्षी करोनामुळे आयपीएल भारतामध्ये खेळवणे सोपे नव्हते. त्यावेळी युएईचाच विचार करण्यात आला होता. त्यामुळे आता यावर्षी जर विश्वचषकही भारतामध्ये होऊ शकला नाही तर त्यासाठी युएईचा पर्याय आहे. त्यासाठी आता युएईच्या सरकारची आणि त्यांच्या क्रिकेट मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी युएईमध्ये स्पर्धा खेळवण्याचा चांगला अनुभव बीसीसीआयला आहे. त्यामुळे जर भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक होऊ शकला नाही तर युएईमध्ये त्याचे आयोजन करणे बीसीसीआयसाठी कठीण नसेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aRVmiW
No comments:
Post a Comment