![](https://maharashtratimes.com/photo/82253073/photo-82253073.jpg)
चेन्नई: देशात करोनाचे मृत्यू तांडव सुरू आहे. अशाच आयपीएलचा १४वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रवीचंद्रन अश्विन याने मधून नाव माघारी घेतले आहे. करोनामुळे स्पर्धेच्या मधूनच नाव मागे घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. वाचा- दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम मुंबईत काही लढती खेळल्या होत्या. त्यानंतर ते चेन्नईत दाखल झाले. काल रविवारी दिल्लीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळला. यात अश्विन देखील खेळला होता. सामना झाल्यानंतर अश्विनने सोशल मीडियावर ही माहिती दिली. या कठिण काळात मी कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. वाचा- ... उद्यापासून मी आयपीएलच्या या हंगामातून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय करोनाशी लढत आहेत. अशा कठीण काळात मी त्यांच्या सोबत राहणार आहे. जर परिस्थिती ठिक झाली तर मला पुन्हा आयपीएलमध्ये परत येण्याची आशा आहे. अश्विनच्या या ट्विटला दिल्ली कॅपिटल्सने उत्तर दिले आहे. या अवघड काळात आम्ही तुला पूर्ण पाठिंबा देतो. तुझ्यासाठी आणि कुटुंबासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रार्थना नेहमी असतील. वाचा- संपूर्ण जगात पुन्हा एकदा करोनाची लाट आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरनाच्या या दुसऱ्या लाटेत देशात रोज ३ लाखाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना करोनाची लागण झाली होती. धोनीने तेव्हा संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता अश्विनच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज टायने रविवारी वैयक्तीक कारणामुळे मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०२१ मधून बाहेर पडणारा तो चौथा परदेशी खेळाडू ठरला. याआधी इंग्लंडचा जोफ्रा आर्चर (दुखापत), बेन स्टोक्स (दुखापत), लियाम लिव्हिगस्टोन (बाबो-बबलमुळे थकवा) हे आयपीएलमधून बाहेर पडले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Qwv7Yj
No comments:
Post a Comment