मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली( )ने आयपीएल २०२१च्या १६व्या लढतीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध ५१वी धाव घेत इतिहास घडवला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात प्रथम ६ हजार धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या सामन्याआधी विराटच्या नावावर ५ हजार ९४९ धावा होत्या. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत बेंगळुरूला १७८ धावांचे आव्हान दिले होते. देवदत्त पडिक्कल सोबत डावाची सुरूवात करणऱ्या विराटने ३४ चेंडूत आयपीएलमधील ४०वे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ३५व्या चेंडूवर चौकार मारत आयपीएलमधील ६ हजार धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. वाचा- आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आधीपासून विराटच्या नावावर होता. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना ५ हजार ४४८ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन ५ हजार ४२८ धावांसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ५ हजार ३८४ धावांसह चौथ्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ५ हजार ३६८ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात राजस्थानचे आघाडीची फळी धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर देखील त्यांनी १७७ धावांपर्यंत मजल मारली. पण सलग तीन सामन्यात विजय मिळवणाऱ्य बेंगळुरूच्या संघाने १० विकेटनी विजय मिळवाल आणि विजयाचा चौकार मारला. विराटने आपीएलमध्ये आतापर्यंत १ ते ७ या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या प्रत्येक क्रमांकावर त्याने किती धावा केल्या जाणून घेऊयात... क्रमांक १- ८०१ धावा क्रमांक २- १ हजार ६८७ धावा क्रमांक ३- २ हजार ६९६ धावा क्रमांक ४- ३७६ धावा क्रमांक ५- १७३ धावा क्रमांक ६-२३७ धावा क्रमांक ७-५१ धावा
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dJFeSe
No comments:
Post a Comment