नवी दिल्ली : देशातील करोनाच्या लढाईमध्ये आता भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर () आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या घडीला देशात ऑक्सिजनची () कमतरता जाणवत आहे. यासाठी आता सचिनने पुढाकार घेतला असून त्याने यासाठी मोठे दान केल्याचेही पाहायला मिळाले आहे. देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहिल्यावर काही युवा उद्योजक आता पुढे सरसारवे आहेत. या मिशन ऑक्सिजनसाठी या युवा उद्योजकांना पैशांची चणचण भासत होती. पण सचिन यावेळी त्यांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण सचिनने या मिशन ऑक्सिजनसाठी आता तब्बल एक कोटी रुपये दान केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता करोनाच्या लढ्यात सचिन उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. सचिनने केली करोनावर मात आणि...सचिनने काही दिवसांपूर्वी करोनावर मात केल्याचे पाहायला मिळाले होते. सचिन हा गेल्या काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी क्रिकेट सीरिजमध्ये खेळला होता. ही स्पर्धा भारताने जिंकली. पण ही स्पर्धा संपवून घरी आल्यावर सचिनला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सचिनने करोनावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटल गाठले होते आणि त्याने करोनावर मात केल्याचे पाहायला मिळाले. सचिनने काही दिवसांपूर्वी प्लाझ्मादेखील दान करण्याचे आवाहन केले होते. सचिनने याबाबत एक व्हिडीओ बनवला होता. सचिनने आपल्या या व्हिडीओमध्ये सांगितले की, " मला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. पण त्यावर मी आता मात केली आहे. मी २१ दिवस विलगीकरणामध्ये होतो आणि त्यावेळी मला तुमच्या शुभेच्छांचा फायदा झाला. त्याचबरोबर डॉक्टरांनी माझ्यावर चांगले उपचार केले. त्यानंतर डॉक्टरांनी मला एका गोष्टीची विनंती केली आणि तिच गोष्ट मी आता करणार आहे. मी आता प्लाझ्मा देणार आहे आणि तुम्हीही याचे दान करायला हवे. कारण जर करोनाबाधित रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळाला तर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट करणे फार महत्वाचे आहे. मी ही गोष्ट आता करणार आहे आणि समाजाच्या उपयोगासाठी तुम्हीही ही गोष्ट करायला हवी, अशी मी तुम्हाला विनंती करत आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e2LTXQ
No comments:
Post a Comment