मुंबई: आयपीएल २०२१च्या १८व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करत कोलकाताने फक्त ९ बाद १३३ धावा केल्या. विजयाचे लक्ष्य राजस्थानने चार विकेटच्या बदल्यात पार केले. राजस्थानचा या हंगामातील हा दुसरा विजय ठरला. वाचा- या सामन्यात कोलकाता संघाची फलंदाजी सुरू असताना राजस्थानच्या दोन खेळाडूंनी चक्क सेल्फी काढला. कोलकाताचा फलंदाज राहुल त्रिपाठीला मुस्तफिजुरने बाद केले. त्याचा कॅच रियान परागने घेतला. या कॅचनंतर जल्लोष करताना रियानने राहुल तेवतियासोबत सेल्फी घेण्याची अॅक्शन केली. या दोघांच्या या जल्लोषाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि यांच्या फोटोवर चाहते देखील मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. आयपीएलमध्ये अशा हटके पद्धतीने खेळाडूने जल्लोष करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघातील ऑलराउंडर रविंद्र जडेजाने देखील एकाच सामन्यात चार कॅच घेतल्यानंतर मैदानावरून फोन केल्याची अॅक्शन केली होती. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे राजस्थाने कोलकाताला फक्त १३३ धावात रोखले. केकेआरकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर ख्रिस मॉरिसने चार विकेट घेतल्या. विजयाचे आव्हान राजस्थान संघाने चार विकेटच्या बदल्यात १९व्या षटकात पार केले. कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४२ धावा केल्या. या विजयामुळे गुणतक्यात अखेरच्या स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स सहाव्या क्रमांकावर पोहोचले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xp6RI8
No comments:
Post a Comment