चेन्नई : महेंद्रसिंग धोनी हाएक निष्णात कर्णधार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण प्रत्येक सामन्यापूर्वी काही खेळाडूंच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असतात आणि त्यामुळेच ती व्यक्ती काही गोष्टी करत असतो किंवा काही गोष्टी टाळायचा प्रयत्न करत असतो. धोनीच्या बाबतही अशीच एक गोष्ट असून समोर आली आहे. प्रत्येक सामना सुरु होण्यापूर्वी प्रत्येक संघ एकत्रितपणे येऊन हर्डल करत असल्याचे आपण सर्वच पाहतो. धोनीदेखील चेन्नईच्या संघाबरोबर ही गोष्ट करतो. पण जे अन्य कर्णधार यावेळी जी गोष्ट करतात, ती गोष्ट धोनी टाळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे धोनी ही गोष्ट नेमकी का टाळतो, याचा खुलासा भारताचा माजी क्रिकेटपटू प्रग्यान ओझाने केला आहे. धोनीबाबत ओझा म्हणाला की, " प्रत्येक कर्णधार सामन्यापूर्वी आपल्या खेळाडूंना शुभेच्छा देतो किंवा ऑल द बेस्ट असे म्हणतो. पण धोनी ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. धोनीला असे वाटते की, आपण जर खेळाडूंबाबत ही गोष्ट केली तर त्यांच्या कामगिरीवर याचा परीणाम होऊ शकतो आणि त्याच्या खेळीची अखेर ही वेगळ्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळेच धोनी कधीही सामन्यापूर्वी खेळाडूंना शुभेच्छा देत नाही, कदाचित ही त्याची अंधश्रद्धा असेल. याबाबत मी धोनीबाबत चर्चाही केली होती. त्यावेळी धोनीने मला सांगितले की, मी कधीही संघातील खेळाडूंना सामन्यापूर्वी शुभेच्छा देत नाही. पण मला असं वाटतं की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी ही गोष्ट करायला हवी." धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा आज सामान कोलकाता नाइट रायडर्सबरोबर होणार आहे. या सामन्यात जर चेन्नईच्या संघाने विजय मिळवला तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल. सध्याच्या घडीला चेन्नईचा संघ हा गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्याचबरोबर या तीन सामन्यांमध्ये त्यांना दोन विजय मिळवता आले आहेत आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आजचा सामना जर चेन्नईच्या संघाने जिंकला तर त्यांचे सहा गुण होतील आणि नेट रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32yHpBN
No comments:
Post a Comment