मुंबई : दुखापत, बायो बबलमुळे आलेला थकवा आणि भारतात करोना रुग्णांची वाढती संख्या या कारणांमुळे चार विदेशी खेळाडूंनी आयपीएलचा १४वा हंगाम सुरू असताना माघार घेतल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ अडचणीत आला आहे. आयपीएलच्या चालू हंगामातील अद्याप निम्म्या लढती देखील झाल्या नाही. स्पर्धेचा मोठा कालावधी शिल्लक असताा राजस्थान संघावर दुसऱ्या संघांकडून खेळाडू उधार घेण्याची वेळ आली आहे. वाचा- राजस्थान रॉयल्सचा संघ या वर्षी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संघाकडून खेळणारे बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. तर लियाम लिव्हिंगस्टोने बायो बबलमुळ थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली. तर रविवारी एड्यू टायने भारतात कोरना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑस्ट्रेलियात परत जाण्याचा निर्णय घेतला. या चार खेळाडूंनी माघार घेतल्याने संघाची अवस्था बिकट झाली आहे. वाचा- संघातील एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील उर्वरित सामने खेळण्यासाठी अन्य संघाकडू खेळाडू उधार घेण्याची आमची योजना आहे. यासंदर्भात आम्ही अन्य संघांशी संपर्क केला आहे. पण सध्या याबाबत काही ठरवण्यात आले नाही. वाचा- आयपीएलमध्ये खेळाडूंना अन्य संघांकडून घेण्याचा कालावधी सोमवारपासून सुरू झाला आहे. जो साखळी फेरीतील सामने संपेपर्यंत सुरू असेल. आयपीएलच्या नियमानुसार कमीत कमी दोन सामने खेळणाऱ्या खेळाडूला दुसरा संघ स्वत:कडे घेऊ शकतो. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन लढतीत त्यांचा विजय झालाय. आता गुरुवारी त्यांची लढत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sUxvFm
No comments:
Post a Comment