चेन्नई: आयपीएलच्या गेल्या हंगामातील गतविजेते दिल्ली कॅपटिल्स संघ या वर्षी देखील दमदार कामगीरी करत आहे. आतापर्यत झालेल्या चार पैकी तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली गुणतक्यात तिसऱ्या स्थानावर असून त्यांची पुढील लढत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम सुरू होण्याआधी दिल्ली संघाला मोठा झटका बसला होता. कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलला करोनाची लागण झाल्याने तो पहिल्या काही लढतीसाठी उपलब्ध झाला नाही. त्याच पाठोपाठ जलद गोलंदाज इशांत शर्माला देखील दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. वाचा- दोन महत्त्वाचे गोलंदाज संघात नसताना दिल्लीची कामगिरी चांगली झाली. आता दिल्ली संघाच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे. करोनामुळे २० दिवसांच्या क्वारंटाइन मध्ये गेलेला पुन्हा एकदा संघाशी जोडला गेलाय. अक्षर २८ मार्च रोजी मुंबईत संघाशी जोडला गेला होता. त्यानंतर ३ एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता अक्षर करोना मुक्त झाला असून तो पुन्हा संघात दाखल झालाय. वाचा- क्वारंटाइन मध्ये २० दिवस राहिल्यानंतर पुन्हा संघात आल्याचा खुप आनंद होत आहे. भारतीय संघातून कसोटीत पदार्पण केल्यानंतर हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहे, असे अक्षरने म्हटलय. अक्षर सोबत दिल्ली संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे गेल्या काही सामन्यासाठी उपलब्ध नसलेला आता फिट झाला आहे. त्यामुळे पुढील सामन्यापासून तो देखील निवडीसाठी उपलब्ध असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32HyhuY
No comments:
Post a Comment