चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात उद्या शुक्रवारी आणि यांच्यात लढत होणार आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळला आहेत. त्यापैकी मुंबईने दोन विजय आणि दोन पराभव तर पंजाबने १ विजय आणि ३ पराभव स्विकारले आहेत. गुणतक्यात मुंबई चौथ्या स्थानावर तर पंजाब सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांची एकच मुख्य समस्या आहे आणि ती म्हणजे फलंदाजीत सुधारणा करणे होय. मुंबईने खराब फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची लढत गमावली होती. वाचा- मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली आहे. पण अन्य फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. सलामीवीर क्विंटन डी कॉक अपयशी ठरलाय. तर मधळ्या फळीतील फलंदाज देखील धावा करू शकले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आधीच्या दोन लढतीत १५० या धावसंख्येचे मुंबईने संरक्षण केले होते. तेव्हा गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. वाचा- २०२०च्या हंगामातील या विजेत्या संघात रोहित शर्मा चांगल्य फॉर्ममध्ये आहे. पण गेल्या हंगामातील हिरो सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना अद्याप धावा करता आल्या नाहीत. या शिवाय कायरन पोलार्ड, पंड्या बंधूंना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमधील या सुरुवातीच्या लढती आहेत त्यामुळे पंजाब विरुद्ध फॉर्म मिळवण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. वाचा- पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या लढतीत विजय मिळवल्यानंतर त्यांना सलग तीन पराभव स्विकारावा लागलाय. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्यांना फक्त १०६ तर हैदराबाद विरुद्ध १२० धावा करता आल्या. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल हे दोन फलंदाज वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. ख्रिस गेल देखील अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. वाचा- सलग तिसऱ्या पराभवाने पंजाबचे खेळाडू निराश असतील. पण संघाने या पुढे विजय नाही मिळवली तर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा सोडून द्याव्या लागतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nbYFGC
No comments:
Post a Comment