अहमदाबाद: आयपीएलच्या १४व्या हंगामात काल मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर १ धावाने सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. वाचा- नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत दिल्ली समोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीकडून एबीडिव्हिलियर्सने ४२ चेंडूत नाबाद ७५ धावा केल्या. उत्तरा दाखल दिल्लीची सुरुवात खराब झाली. पण शिमरोन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने जवळ जवळ विजय मिळवला होता. पण विजयासाठी त्यांना दोन धावा कमी पडल्या. हेटमायरने २५ चेंडूत नाबाद ५३ तर पंतने ४८ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. वाचा- ... अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज होती. पण त्यांना १२ धाा करता आल्या. एका धावाने पराभव झाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत भावनिक झाला. हेटमायर आणि पंतने विजयासाठी खुप प्रयत्न केले. पराभवामुळे हे दोघेही निराश झाले. हेटमायर क्रीझवर बसला तर पंतच्या चेहऱ्यावर पराभवाचे दुख: होते. दिल्लीच्या या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने अशी कृती केली ज्याने सर्वांचे मन जिंकले. नियमानुसार विराटने पंतशी हस्तदोलन केले. पण त्यानंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तसेच थोडावेळ त्याच्या जवळ थांबून पाठीवर शाब्बासकी देखील दिली. दुसरीकडे अखेरच्या षटकात शानदार गोलंदाजी करून संघाला विजय मिळून देणारा हेटमायरच्या जवळ गेला आणि त्याला मिठी मारली. सिराजने त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले. क्रिकेट मैदानावरील या घटनेमुळे चाहते खुश झाले. त्यांनी सोशल मीडियावर यासाठी आणि मोहम्मद सिराज यांचे कौतुक केले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. आयपीएलने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dVMYAW
No comments:
Post a Comment