चेन्नई : आयपीएलच्या १४व्या हंगामात पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ४० चेंडूत अर्धशतक झळकावले. मुंबईकडून एकट्या रोहितने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. प्रथम फलंदाजी करत मुंबईने ६ बाद १३१ धावा केल्या. वाचा- पंजाबने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. या सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये हेनरिक्सच्या चेंडूवर रोहित शर्माला अंपायरने बाद दिले. हेनरिक्सचा चेंडू लेग साइडच्या बाहेर जात होता. हा चेंडू रोहितने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू रोहितच्या पायाला लागून विकेटकिपरकडे गेला. वाचा- पंजाबच्या खेळाडूंनी आउटची अपिल केली आणि अंपायरने तातडीने त्याला बाद दिले. यावर रोहितने देखील डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये रोहित आउट नसल्याचे स्पष्ट झाले. पण या दरम्यान रोहित अंपायरवर भडकल्याचे दिसले. वाचा- रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात रोहितने ५२ चेंडूत ६३ धावा केल्या. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रोहितने अर्धशतकासह आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून १ हजार ५०० धावा देखील पूर्ण केल्या. रोहितने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये २३व्यांदा ५० हून अधिक धावा केल्या. या बाबत त्याने एमएस धोनीला मागे टाकले. धोनीने अशी कामगिरी २२ वेळा केली आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने ३८ वेळा ही कामगिरी केली. आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sMNFk0
No comments:
Post a Comment