चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील १७वी लढत आणि यांच्यात होणारआहे. गतविजेत्या मुंबईने चार पैकी दोन लढतीत विजय तर दोन लढतीत पराभव स्विकारला आहे. या सामन्यात मुंबईचा संघ विजय मिळवण्याच्या उद्देशाने खेळेल. पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात काही बदल करेल का यावर एक नजर... वाचा- फलंदाजीच्या तुलनेत मुंबई इंडियन्सची गोलंदाजी चांगली झाली आहे. आजच्या लढतीत पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक ही जोडी सलामीला दिसेल. रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी डी कॉक धावा करण्यात अपयशी ठरलाय. आज दोन्ही ही फलंदाज मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतील. मधळ्या फळीवर मोठी जबाबदारी सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पंड्या ही मुंबईची मधळी फळी आहे. सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण इशान आणि हार्दिकला अद्याप धावा करता आल्या नाहीत फलंदाजी सोबत गोलंदाजी करणाऱ्या कायरन पोलार्ड आणि क्रुणाल पंड्या या दोघांकडून चांगल्या कागिरीची अपेक्षा आहे. मजबूत गोलंदाजी जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. त्यांना फिरकीपटू राहुल चहारची उत्तम साथ देखील मिळाली. गेल्या सामन्यात जयंत यादवचा संघात समावेश केला होता. संभाव्य संघ- रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, राहुल चहर जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3es7XKy
No comments:
Post a Comment