मुंबई : महेंद्रसिंग धोनी हा किती चाणाक्ष कर्णधार आहे, याचा उत्तम वस्तुपाठ आजच्या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल हा फलंदाजी करत असताना धोनीने फिरकीपटू रवींद्र जडेजाला एक मंत्र दिला आणि त्यानंतर कमालच झाली. कारण हा मंत्र मिळाल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर जडेजाने मॅक्सवेलची विकेट मिळवव्याचे पाहायला मिळाले. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेल धडाकेबाज फलंदाजी करत होता. जडेजाच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याने चौकारही लगावला होता. मॅक्सवेल आता पुन्हा एकदा मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण त्याचवेळी धोनीने जडेजाला एक मंत्र दिला आणि त्यानंतरच्याच चेंडूवर मॅक्सवेल आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. धोनीने यावेळी जडेजाला सांगितले की, " मॅक्सवेल हा मोठा फटका मारणार आहे. त्याला तु मोठा फटका मारण्यासाठीच चेंडू टाक, पण हा फटका मारताना मॅक्सवेलला थोडा विचार करायला लाव. त्यामुळे आता जो चेंडू टाकशील त्यावर मॅक्सवेलला थोडा विचार करायला लाव." धोनीने नवव्या षटकातील पाचवा चेंडू टाकण्यापूर्वी जडेजाला हा मंत्र दिला होता. त्यानंतर जडेजाने यावेळी लेग स्टम्पच्या दिशेने थोड्या संथ गतीने चेंडू टाकला. या चेंडूवर मॅक्सवेल मोठा फटका मारायला गेला आणि त्यावेळी तो त्रिफळाचीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे धोनीचा एक मंत्र यावेळी जडेजाच्या चांगलाच कामी आल्याचे पाहायला मिळाले. जडेजाना आजच्या सामन्यात फक्त ग्लेन मॅक्सवेललाच बाद केले नाही, तर त्याने एबी डिव्हिलियर्सचाही काटा काढला. जडेजाने केली तुफानी फलंदाजी...आरसीबीविरुद्धच्या आजच्या सामन्यात जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारले आणि चेन्नईला या सामन्यात मोठी आघाडी मिळून दिली. त्याने २३ चेंडूत अर्धशतक केले. आरसीबीकडून पटेलने २०वे षटक टाकले आणि जडेजाने या षटकात ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महाग षटक ठरले. त्यामुळे आजच्या सामन्याचा हिरो हा जडेजाच ठरल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sMUKBb
No comments:
Post a Comment