अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि संघात मोठा बदल केला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने आज पहिल्यांदाच भारताच्या एका अनुभवी खेळाडूला संधी दिली आहे. दिल्लीच्या संघातून आर. अश्विन हा बाहेर पडला आहे. त्याच्याजागी दिल्लीच्या संघाने भारताला अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला आज संधी दिली आहे. इशांतचा हा पहिलाच सामना असणार आहे. इशांतला यापूर्वी दुखापत झाली होती आणि तो त्यामधून सावरला नव्हता. काही दिवसांपूर्वी इशांत फिट झाल्याचे पाहायला मिळाले होते, पण त्याला आतापर्यंत संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात इशांत दिल्लीच्या संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे इशांत आजच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आर. अश्विनने आयपीएल सोडण्याचा निर्णय सोमवारीच घेतला होता. अश्विनच्या कुटुंबियांना करोनाची बाधा झाली आहे. याबाबत अश्विन म्हणाला की, " उद्यापासून मी आयपीएलच्या या हंगामातून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय करोनाशी लढत आहेत. अशा कठीण काळात मी त्यांच्या सोबत राहणार आहे. जर परिस्थिती ठिक झाली तर मला पुन्हा आयपीएलमध्ये परत येण्याची आशा आहे." आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाला गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत ते पुन्हा एकदा विजयाच्या नार्गावर परतणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवणार आणि त्याचबरोबर अव्वल स्थानावर विराजमान होणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पण गेल्या सामन्यात आरसीबीला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. यामधून आरसीबीचे फलंदाज काही धडा घेणार का, हे पाहावे लागेल. त्याचबरोबर दिल्लीचा संघ आपल्या विजयाची सय कायम राखणार हा, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QXFNz4
No comments:
Post a Comment