नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजीकरत २० षटकात ४ बाद १७१ धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने ४२ तर जोस बटलरने ४१ धावा केल्या. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जयसवाल यांनी राजस्थानला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७.४ षटकात ६६ धावा करून दिल्या. बटलर ४१ धावांवर बाद झाला. त्याला राहुल चहरने बाद केले. त्यानंतर यशस्वी ३२ धावांवर माघारी परतला. त्याची विकेट देखील राहुलने घेतली. संजू आणि शिवम दुबे यांनी संघाला १५०च्या जवळ पोहोचवले. दुबे ३५ धावांवर बाद झाला. तर संजू २७ चेंडूत ४२ धावा करून माघारी परतला. मुंबई इंडियन्सकडून राहुल चहरने सर्वाधिक २, बोल्ट आणि बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32WizMs
No comments:
Post a Comment