मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात अनेक परदेशी खेळाडूंनी स्पर्धेच्या मधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यात अधिकतर खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. सोमवारी ज्या खेळाडूंनी मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला ते खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून खेळतात. आता मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने आपल्या देशातील बोर्डाला चार्टर प्लेनची सोय करण्याची मागणी केली आहे. वाचा- मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या या खेळाडूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की त्यांनी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी चार्टर विमानाची सोय करावी. लीन म्हणाला, या संदर्भात मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक पत्र लिहले आहे. खेळाडू प्रत्येक वर्षी कराराच्या माध्यमातून १० टक्के पैसे कमावतात. आमच्याकडे या पैशाचा या वर्षात वापर करण्याची संधी आहे. जेव्हा ही स्पर्धा संपेल तेव्हा चार्टर विमानाची सोय करावी. वाचा- मला कल्पना आहे की असे लोक आहेत ज्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा अधिक वाइट आहे. पण आमचे बायो बबल देखील खुप कडक आहे. पुढील आठवड्यात आम्हाला कोव्हिडची लस मिळण्याची शक्यता आहे. तरी देखील आम्हाला आशा आहे की, सरकार एका खासगी चार्टर विमानाची व्यवस्था करेल. वाचा- मी आयपीएलचा कालावधी कमी करा असे म्हणणार नाही. कारण या धोक्याची कल्पना सर्वांना पहिल्या पासून होती आणि त्यानंतरच आम्ही कराराव स्वाक्षरी केली. माझे फक्त इतकेच म्हणणे आहे की, स्पर्धा संपल्यानंतर घरी परतण्यासाठी विमानाची सोय केल्यास बरे होईल, असे लीन म्हणाला. बायो बबलमध्ये मला सुरक्षित वाटत आहे आणि यातून बाहेर पडण्याचा विचार मी करत नाही. भारत सध्या कठिण कालावधीतून जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही काही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहोत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dQMJHg
No comments:
Post a Comment