नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा (Happy Birthday ) आज वाढदिवस आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितला यावेळी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मासाठी एक खास व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. रोहित शर्मा हा बॅट हवेत उडवून तो कशी हातात पकडतो, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर रोहितची तुलना यावेळी एका परदेशातील एका अभिनेत्याबरोबर करण्यात आली आहे. हा व्हिडीओ चांहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी रोहितचा अजून एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोहित आपल्या मुलीबरोबर आहे. रोहित आणि त्याच्या मुलीमधील जे भावनिक नाते आहे, ते या फोटोमधून दाखवण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्सने केला आहे, असे यामधून दिसत आहे. हा फोटोही चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. रोहितला सतावत आहे ही चिंता....मुंबई इंडियन्सचा उद्या सामना होणार आहे तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईच्या संघाबरोबर. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्यात काही चुका झाल्या होत्या आणि त्यामुळे रोहित चिंतेत असल्याचे चाहत्यांना वाटत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावर जास्त विजय मिळवलेले आहेत. पण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मात्र गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. कृणाल पंड्या हा गोलंदाजीमध्ये सपशेल अपयशी ठरला. कारण त्याच्या एकाच षटकात १२ धावा फटकावल्या आणि रोहितने त्यानंतर कृणालला एकही षटक दिले नाही. त्याचबरोबर मुंबई इंडियन्ससाठी जयंत यादव आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. पण या सामन्यात मात्र जयंतच्या गोलंदाजीला चांगलाच मार पडल्याचे पाहायला मिळाले. कारण जयंतच्या तीन षटकांमध्ये राजस्थानच्या फलंदाजांनी तब्बल ३७ धावा लुटल्या. त्यामुळे रोहितने जयंतला यावेळी चौथे षटक टाकण्यासाठी दिले नाही. त्यामुळे ही गोलंदाजीची चिंता कशी सोडवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aUtFWy
No comments:
Post a Comment