मुंबई: देशभरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आढळत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशन( )ने एक मोठा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्यांनी गुरुवारी दिली. वाचा- येत्या जून महिन्यात होणारी () स्पर्धा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील एक पत्रक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि टी २० सामना नियामक समितीचे प्रमुख मिलिंद नार्वेकर यांनी जारी केले आहे. वाचा- या पत्रकात म्हटले आहे की, परिस्थितीवर ताण पडू न देण्याचा हा आमचा मार्ग असून परिस्थिती सुधारल्यावर निर्णयाचा फेरविचार करू. हे पत्रक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि टी २० सामना नियामक समितीचे प्रमुख मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात पत्रक जारी केले आहे. वाचा- बीसीसीआयने दिली होती परवानगी बीसीसीआआयने राज्य क्रिकेट संघटनाना टी-२० लीग स्पर्धा आयोजिक करण्याची परवानगी बुधवारी दिली होती. आयपीएलचा १४वा हंगाम ३० मे रोजी संपणार आहे. त्यानंतर राज्य संघटना त्यांच्या टी-२० लीग स्पर्धा आयोजित करू शकते असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने करोना परिस्थितीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलली आहे. दरम्यान, तामिळनाडू क्रिकेट संघटनेने बायो बबल वातावरणात स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केल आहे. MCAकडून याआधी २०१८ आणि २०१९ मध्ये टी-२० लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t3wzhW
No comments:
Post a Comment