मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ कधी काय करु शकेल, हे सांगता येत नाही. कारण आरसीबीचा या आयपीएलमधील विजयरथ त्यांनी रोखला. पण या सामन्यात चेन्नईच्या संघाने आरसीबीचा विजयरथ रोखत तीन मोठे धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाने चारपैकी चारही सामने जिंकले होते आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थआन पटकावले होते. पण चेन्नईच्या संघाने या सामन्यात आरसीबीला धुळ चारली आणि गुणतालिते अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नईचा रनरेट एवढा चांगला आहे की, दुसऱ्या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला तरी चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर राहू शकतो. त्यामुळे आजच्या दिवशी तरी चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर कायम राहू शकतो, असे चित्र आहे. चेन्नईने यावेळी आरसीबीला दुसरा धक्का दिला तो म्हणजे त्यांचा विजयरथ रोखला. आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये आरसीबीला एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. पण धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने आरसीबीचा विजयरथ रोखत त्यांना दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे या आयपीएलमध्ये असा कोणताही संघ उरलेला नाही, ज्याला फक्त विजयच मिळवता आले आहेत. आरसीबीचा एकच संघ आतापर्यंत अपराजित होता, पण आजच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या संघाने यावेळी आरसीबीला तिसरा आणि महत्वाचा धक्का दिला, तो म्हणजे तुमची फलंदाजी कितीही बळकट दिसत असली तरी तुम्हाला कमीत कमी धावात कोणताही संघ गुंडाळू शकतो. कारण गेल्या सामन्यात एकही विकेट न गमावता आरसीबीने विजय साकारला होता. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सदेखील चांगल्या फॉर्मात होते. पण एकाच सामन्यात देवदत्त पडीक्कल, कर्णधार विराट कोहली, मॅक्सवेल आणि एबी हे फलंदाज कसे धारातीर्थी पडू शकतात, हे चेन्नईच्या संघाने आज दाखवून दिले. त्यामुळे आजचा सामना आरसीबीसाठी महत्वाचा असेल. कारण आजच्या सामन्यातून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातून आरसीबीचा संघ कोणती शिकवण घेतो आणि यापुढे कशी कामगिरी करतो, हे पाहणे सर्वांत महत्वाचे असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sT2gui
No comments:
Post a Comment