मुंबई : मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला पराभवाच्या गर्तेत अडकलेला आहे. त्याचबरोबर आता मुंबई इंडियन्सला अजून एक धक्का बसला आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघातील एक खेळाडू आता आरसीबीकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला बऱ्याच समस्या सध्याच्या घडीला जाणवत आहेत. त्यांच्याकडून गोलंदाजी चांगली होत असली तरी त्यांची फलंदाजी मात्र चांगली होताना दिसत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात चिंतेचे वातावरण आहे. त्यामध्येच आता मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू संघाला सोडून आरसीबीकडून खेळणार आहे. आरसीबीच्या संघातील अॅडम झाम्पा आणि केन रिचर्डसन आता आयपीएल खेळणार नाहीत, कारण त्यांना आपल्या मायदेशी परतायचे आहे. त्यामुळे आता केन रिचर्डसनच्या बदल्यात आरसीबीच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या स्कॉट कुगेलेइजिन या राखीव खेळाडूला आपल्या संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा एक पर्याय आता कमी झाला आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही संघातील खेळणारा खेळाडू दुसऱ्या संघात मीड ट्रान्सफरशिवाय जाऊ शकत नाही. पण जर संघाता एखादा राखीव खेळाडू असेल तर त्याला दुसरा संघ आपल्या ताफ्यात दाखल करून घेऊन शकतो. त्यामुळे आता आरसीबीच्या संघात आता मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू जाणार असल्याचे क्रिकइन्फो या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला सध्याच्या घडीला फलंदाजीची चिंता सतावते आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघातील मधल्याफळीतील फलंदाज हे सातत्याने अपयशी ठरताना पाहायला मिळाले आहेत. हार्दिक पंड्या, इशान किशन, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड यांना आतापर्यंत सातत्याने चांगल्या धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला जर यापुढे सामना जिंकायचा असेल तर या खेळाडूंना चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाला आपल्या फलंदाजीमध्ये मोठे बदल करावे लागतील. त्याचबरोबर काही राखीव खेळाडूंनाही त्यांना आता संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांना मुंबई इंडियन्सचा संघ काही सामन्यांसाठी विश्रांती देणार का, हे पाहणे महत्वाचे असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nrMq8W
No comments:
Post a Comment