मुंबई: अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी करून प्रथम संघाला २००च्या जवळ पोहोचवल्यानंतर गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात शानदार कामगिरी करणाऱ्या ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आणि त्यांनी विराट कोहलीच्या बेंगळुरूचा विजय रथ देखील रोखला. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. वाचा- कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९.१ षटकात ७४ धावा केल्या. ऋतुराज २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या रैनाने फाफसह संघाचे शतक पूर्ण करून दिले. पण १११ धावांवर प्रथम रैना वैयक्तीक २४ धावांवर नंतर फाफ ५० धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईची अवस्था ३ बाद १११ अशी झाली. वाचा- अंबाती रायडूला देखील फार मोठी धावसंख्या करता आली नाही. तो ७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकात जडेजाच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटाकत १९१ धावा केल्या. जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. जडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात पाच षटकार मारले आणि चेन्नईला या सामन्यात मोठी आघाडी मिळून दिली. त्याने २३ चेंडूत अर्धशतक केले. आरसीबीकडून पटेलने २०वे षटक टाकले आणि जडेजाने या षटकात ३७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महाग षटक ठरले. वाचा- विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूला सुरूवात तरी चांगली मिळाली. पण ती काही षटकापूरती मर्यादीत ठरली. पहिल्या ३ षटकात देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांनी ४४ धावा केल्या. पण चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली (८ धावा) बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले. त्यानंतर शार्दुलने देवदत्तला बाद केले. देवदत्तने १५ चेंडूत ३४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरला जडेजाने बाद केले. त्यानंतर धोकादायक ग्लेन मॅक्सवेलची बोल्ड त्याने काढली. तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॅनियल ख्रिस्टिनला जडेजाने धावबाद केले. बेंगळुरूची अवस्था ५ बाद ८१ अशी होती. मैदानावर एबी डिव्हिलियर्स असल्याने आरसीबीला आशा होत्या. पण जडेजाने पुन्हा एकदा कमाल केली. त्याने एबीला बोल्ड केले आणि बेंगळुरूचा पराभव निश्चित केला. बेंगळुरूने २० षटकात ९ बाद १२२ धावा केल्या. या सामन्यात जडेजाने नाबाद ६२ धावा केल्या. गोलंदाजीत ४ षटकात १३ धावा देत ३ विकेट तर क्षेत्ररक्षणात एकाला धावबाद केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sK2uUE
No comments:
Post a Comment