नवी दिल्ली: भारतात करोनाची दुसरी लाट आली असून देशात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. देश विरुद्ध लढत असताना आयपीएलचा १४वा हंगाम देखील सुरू आहे. देशात करोना संकट असताना आयपीएलवर अनेक जण टीका देखील करत आहेत. अशात एक आनंदाची बातमी आली आहे. वाचा- आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंनी करोनाच्या लढाईत मदत जाहीर केली होती. यात पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांचा समावेश होता. आता आयपीएलमधील एका संघाने करोना रुग्णांसाठी तब्बल ७.५ कोटी इतकी रक्कम मदत करण्याचे जाहीर केले आहे. या संघाने ही मदत जाहीर केली आहे. संघातील खेळाडूंसह संघ मालक आणि व्यवस्थापनाने मिळून हा निधी जमा करणार आहेत. वाचा- राजस्थान रॉयल्स फाउंडेशन आणि ब्रिटिश एशियन ट्रस्ट मिळून हा निधी उभा करणार आहेत. वाचा- वाचा- ब्रिटिश एशियन ट्रस्ट अनेक गोष्टींसाठी भारत सरकार सोबत काम करते. खास करून कौशल्य आणि शिक्षा या क्षेत्रात या ट्रस्टचे महत्त्वाचे योगदान आहे. या ट्रस्टचे संस्थापक प्रिंस चार्ल्स यांनी ऑक्सीजन फॉर इंडिया नावाचे एक आवाहन केले होते. ज्यात ऑक्सीजन निर्माण आणि वितरणाचे काम केले जाणार आहे. याद्वारे रुग्णांना थेट ऑक्सीजन पुरवठा केला जाईल. ज्यामुळे रुग्णालयावरील ओझे कमी होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e0vvak
No comments:
Post a Comment