चेन्नई: आयपीएल २०२१मधील पहिली लढत आणि यांच्यात झाली. या सामन्यात बेंगळुरूने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकात ९ बाद १५९ धावा केल्या. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. वाचा- प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून ख्रिस लीनने ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ३१ तर इशान किशनने २८ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्मा १९ धावांवर धावबाद झाला. वाचा- या सामन्यात बेंगळुरूच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. हर्षल पटेलने ५ विकेट घेतल्या. त्याला अखेरच्या षटाकत हॅटट्रिकची संधी होती. तो हॅटट्रिक पूर्ण करू शकला नसला तरी आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. या शिवाय काइल जेमिसनने देखील शानदार गोलंदाजी केली. त्याच्या एका चेंडूचा व्हिडियो चर्चेत आला आहे. १९व्या षटकात जेमिसनने क्रुणाल पंड्याला यॉर्कर चेंडू टाकला. या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रुणालची बॅट चेंडूला लागली पण त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fZDQfO
No comments:
Post a Comment