चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागत आहे. पण आतापर्यंतच्या पाचही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सकडून सातत्याने काही चुका होत आहेत. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात ख्रिस लीनला संधी दिली होती. ख्रिसने या सामन्यात चांगली फलंदाजीही केली होती. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने ख्रिसला वगळले आणि क्विंटन डीकॉकला संधी दिली. पण आतापर्यंत चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये डीकॉकला दोन अंकी धावसंख्याही गाठता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ ही चुक सुधारणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष नक्कीच असेल. आतापर्यंत मुंबई इंडियन्सची मधली फळी ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. कारण आतापर्यंत हार्दिक आणि कृणाल या दोन्ही पंड्या बंधूंना आतापर्यंत एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. संघाला गरज असताना या पंड्या बंधूंना एकाही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, हे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी चिंतेची बाब असेल. कृणाल हा गोलंदाजी करतो, तिथे तो काही धावा वाचवू शकतो किंवा विकेट्सही मिळवू शकतो. पण हार्दिक गोलंदाजीही करत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी गेल्या पाच सामन्यांमध्ये हार्दिक सातत्याने अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळत आहे. मधल्या फळीतील इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांच्याकडूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. इशात हादेखील सातत्याने अपयशी ठरतो आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात तर इशानला बढती देण्यात आली होती. पण या संधीचे सोने इशानला करता आलेले नाही. आतापर्यंतच्या पाचही सामन्यांमध्ये इशान हा एक फलंदाज म्हणून अपशी ठरला आहे. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये त्याला संधी मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंच पोलार्डने एका सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. पण चार सामन्यांमध्ये मात्र त्याला जास्त धावा करता आलेल्या नाहीत. त्याचबरोबर पोलार्डच्या फलंदाजीतील आक्रमकपणाही आता दिसत नाही. त्यामुळे पोलार्डचा गंभीरपणे विचार मुंबई इंडियन्स करणार का, हा सर्वात महत्वाचा विषय असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sLjU31
No comments:
Post a Comment