नवी दिल्ली : मुंबई इंडियन्ससाठी शनिवारचा सामना हा सर्वात कठीण असेल, असे म्हटले जात आहे. कारण मुंबई इंडियन्सचा हा सामना होणार आहे तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स संघाबरोबर. त्यामुळे या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात मोठ बदल पाहायला मिळू शकतात. मुंबई इंडियन्सच्या संघाने आता फॉर्मात नसलेल्या खेळाडूंनी डच्चू देण्याचे ठरवले आहे. गेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने इशान किशनला संघाबाहेर काढले होते. त्याचबरोबर सध्याच्या घडीला हार्दिक पंड्या हा चांगल्या फॉर्मात दिसत नाही. कारण आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये त्याला फक्त ३६ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात जो न्याय इशानला लावला तोच हार्दिकच्याबाबतही पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या सामन्यात इशान किशनच्या जागी नॅथन कल्टर नाइलला संधी देण्यात आली होती. पण नॅथनला गेल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला पुन्हा संधी देण्यात येईल, असे वाटत नाही. त्यामुळे या सामन्यात नॅथनच्या जागी अॅडम मिल्नेला संधी मिळू शकते, असे दिसत आहे. पण त्याचबरोबर इशान किशनचेही संघात पुनरागमन होण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे नॅथनच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघात कोणता खेळाडू येतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या हा गोलंदाजीमध्ये सपशेल अपयशी ठरला. कारण त्याच्या एकाच षटकात १२ धावा फटकावल्या आणि रोहितने त्यानंतर कृणालला एकही षटक दिले नाही. त्याचबरोबर मुंबई इंडियन्ससाठी जयंत यादव आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. पण या सामन्यात मात्र जयंतच्या गोलंदाजीला चांगलाच मार पडल्याचे पाहायला मिळाले. कारण जयंतच्या तीन षटकांमध्ये राजस्थानच्या फलंदाजांनी तब्बल ३७ धावा लुटल्या. त्यामुळे रोहितने जयंतला यावेळी चौथे षटक टाकण्यासाठी दिले नाही. त्यामुळे या दोन फिरकीपटूंपैकी कोणाला वगळण्यात येते का, हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. त्याचबरोबर कायरन पोलार्डला अजून किती संधी द्यायच्या, याचा विचारही मुंबई इंडियन्सच्या संघाला यावेळी करावा लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u9Xeep
No comments:
Post a Comment