नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील २४वी लढत दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत झालेल्या पाच पैकी ३ लढतीत पराभव तर दोन लढतीत विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्स गुणतक्त्यात चौथ्य तर राजस्थान सातव्या स्थानावर आहे. वाचा- मुंबईने आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी त्यांना विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ अद्याप लयमध्ये आलेला नाही. गेल्या वर्षी विजय मिळवणाऱ्या संघात रोहित शर्मा आज काही बदल करतोय का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वाचा- कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक हेच सलामीवीर म्हणून डावाची सुरूवात करतील. या जोडीला अद्याप मोठी भागिदारी करता आलेली नाही. रोहित शर्माला देखील मोठी धावसंख्या करण्याची प्रतिक्षा असेल. या हंगामात मुंबईची सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे ती मधळी फळी होय. सूर्यकुमार यादव काही सामन्यात फॉर्ममध्ये दिसला. पण इशान किशन अद्याप धावा करू शकला नाही. हार्दिक पंड्या देखील अपयशी ठरतोय. त्याच बरोबर कायरन पोलार्ड आणि क्रुणाल पंड्या यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या दोघांना फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागले. वाचा- गोलंदाजी दमदार मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे दोन अनुभवी गोलंदाज आहेत. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये या दोघांसारखे गोलंदाज नाहीत. फिरकीपटू राहुल चहर देखील शानदार कामगिरी करतोय. गेल्या पाच सामन्यात मुंबईने गोलंदाजीत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. जयंत यादवने देखील कर्णधाराचा विश्वास कमी होऊ दिला नाही. मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u4OeHo
No comments:
Post a Comment