मुंबई : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या १४व्या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवत चेन्नईने ८ गुणांसह गुणतक्त्यात सर्वोत्तम सरासरीसह पहिले स्थान मिळवले आहे. वाचा- चेन्नईने आयपीएलमधील १९व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. या विजयात रविंद्र जडेजाने धमाकेदार कामगिरी केली. जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. तर गोलंदाजीत चार षटकात १३ धावा देत ३ विकेट घेतल्या. या शिवाय फिल्डिंगमध्ये एकाला धावबाद देखील केले. वाचा- जडेजाने ज्या खेळाडूंना बाद केले त्याच स्फोटक ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश होता. या सामन्यात धोनीच्या सल्ल्यामुळे अखेरच्या षटकात ३७ धावा करता आल्याचे जडेजाने सांगितले. धोनीने २०व्या षटकात हर्षल पटेल कशी गोलंदाजी करेल हे जडेजाला सांगितले होते. त्यानंतर गोलंदाजी करताना देखील धोनीने जडेजाला विकेटच्या मागून अनेक सल्ले दिले होते. जेव्हा तो मॅक्सवेलला गोलंदाजी करत होता तेव्हा धोनीने दिलेल्या सल्ल्यानंतर जडेजाला विकेट मिळाली. वाचा- ... जेव्हा जडेजाने मॅक्सवेल आणि एबीला बाद केले तेव्हा हर्षल पटेल फलंदाजी करण्यासाठी आला. हर्षल फलंदाजी करत असताना धोनीने जडेजाला सांगितले की, आता मी हिंदीत बोलू शकत नाही. जेव्हा मॅक्सवेल आणि एबी फलंदाजी करत होते तेव्हा धोनी हिंदीत बोलत होता. पण हर्षलला हिंदी समजत असल्याने धोनीला आता हिंदीत बोलता येत नव्हते. या घटनेचा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खुप व्हायरल होत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t443gt
No comments:
Post a Comment