मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विजय रथ रोखला. चेन्नईच्या ऑलराउंडर रविंद्र जडेजासमोर विराट कोहलीचा बेंगळुरू संघ हतबल दिसला. जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मध्ये योगदान दिले. वाचा- ... मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात जडेजाने २८ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६२ धावा केल्या. त्याने २०व्या षटकात हर्षल पटेलला ३७ धावा काढून संघाला १५४ धावसंख्येवरून १९१ पर्यंत मजल मारून दिली. या स्फोटक खेळीबद्दल बोलताना जडेजा म्हणाला, जेव्ही तुम्ही खेळाचा आनंद घेता तेव्हा संघाच्या विजयात योगदान देता. मी फिटनेस आणि कौशल्यावर खुप मेहनत घेत आहे. माझी मेहनत कामी आली. कारण फलंदाजी आणि गोलंदाजीत मी चांगले योगदान दिले. वाचा- एक ऑलराउंडर म्हणून खेळणे खुप अवघड असते. तुम्हाला सर्व विभागात चांगली कामगिरी करावी लागते. सराव दरम्यान मी फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या सर्व गोष्टी करत नाही. एक दिवस एका स्किलवर काम करतो. तर दुसऱ्या दिवशी फिटनेसवर काम करतो. अशा पद्धतीने मी वर्कलोड मॅनेज करतो, असे तो म्हणाला. अखेरच्या षटकात धोनीमुळे झाल्या ३७ धावा बेंगळुरू विरुद्धच्या अखेरच्या षटकात मी मोठे फटके खेळण्याचा विचार करत होतो आणि धोनीने मला सांगितले की हर्षल पटेल कशा पद्धतीची गोलंदाजी करू शकतो. धोनीने मला सांगितले की, हर्षल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकणार आणि त्यासाठी मी तयार होते. सुदैवाने मी चेंडू चांगला कनेक्ट केला आणि आम्ही १९१ पर्यंत पोहोचलो. आमच्या संघासाठी ती खुप चांगली ओव्हर होती. मी स्ट्राइकवर राहिलो तर धावा करू शकतो. मी गोलंदाजीत योगदान दिले आणि एक धावबाद देखील केले. या गोष्टीचा मला आनंद आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32QoLFE
No comments:
Post a Comment