मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामात खेळणाऱ्या चार खेळाडूंनी करोना व्हायरसमुळे स्पर्धा मधूनच सोडण्याचा निर्णय घेतलाय. यात एक भारतीय आणि तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू एड्यू टायने यासंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. वाचा- टायने भारतात कोरनाचे रुग्ण वाढत चालल्याने ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी होण्याची शक्यता असल्याने मधूनच सोडण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दोहा येथून सेन रोडिओशी बोलताना टायने सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे अनेक क्रिकेटपटू अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणारे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू एडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे. वाचा- याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे भारतातून पर्थमध्ये येणाऱ्या लोकांच्या क्वांरटाइनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पर्थ सरकारने पश्चिम ऑस्ट्रेलियात प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, असे टाय म्हणाला. बायो बबलमध्ये राहिल्याने खुप थकलो आहे हे देखील एक कारण आहे. त्याच बरोबर असा विचार केला की ऑस्ट्रेलियात प्रवेश बंदी होण्याआधी घरी पोहचू. ऑगस्ट महिन्यापासून मी फक्त ११ दिवस बायो बबलच्या बाहेर राहिलो आहे. आता घरी जाण्याची इच्छा आहे. वाचा- इंग्लंड आणि न्यूझीलंडसह अनेक देशांनी भारतातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने ३० टक्के वाहतूक कपात केली आहे आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रोज ३ लाख रुग्ण सापडत आहेत. माझ्या परत येण्याच्या निर्णयानंतर अनेकांनी फोन केले. ते विचारत आहेत की मी कोणत्या मार्गाने जात आहे. जी आकडेवारी समोर येत आहे ती अधिकृत आहे. पण त्यापेक्षा संख्या जास्त असू शकते, असे तो म्हणाला. वाचा- आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ,पॅट कमिन्स, मार्कस स्टायोनिस आदी खेळाडू आहेत. यातील अनेक जण मायदेशात परतण्याचा विचार करत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32UVDNr
No comments:
Post a Comment