मेलबर्न: भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आयपीएलचा १४वा हंगाम मध्येच सोडून राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा जलद गोलंदाज ऑस्ट्रेलियामध्ये परतला. मायदेशात पोहोचल्यानंतर टाय याने आश्चर्य व्यक्त केले की, देशात जेव्हा इतकी मोठी आरोग्य समस्या सुरू आहे तेव्हा आयपीएलमधील संघ क्रिकेटपटूंवर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहेत. वाचा- आयपीएलचा असा ही एक फायदा होत आहे की करोनामुळे आलेला तणाव कमी होण्यास मदत होत आहे. यामुळे ही स्पर्धा सुरू ठेवली पाहिजे असे मत देखील त्याने व्यक्त केले. भारतीय दृष्टीकोणातून पाहिल्यास आयपीएलमधील संघ आयपीएलवर इतके पैसे खर्च करत आहेत जेव्हा देशात लोकांना रुग्णालय मिळत नाही. वाचा- क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू शी बोलताना टाय म्हणाला, जर स्पर्धा सुरू राहिल्यामुळे लोकांचा ताण कमी होत असेल. अथवा यामुळे आशा निर्माण होत असेल तर तर मला वाटते की सुरू ठेवले पाहिजे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत एक सारखी नसते आणि मी सर्व प्रकारच्या विचारांचा सम्मान करतो. वाचा- आयपीएलमधील खेळाडूंच्या सुरक्षे संदर्भात मनात हा प्रश्न निर्माण होतो की ते कधीपर्यंत सुरक्षित राहतील, असे ही टाय म्हणाला. भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑस्ट्रेलियात भारतातून येण्यात बंदी घातली जाऊ शकेत म्हणून टायने आयपीएलमधून माघारी घेतली. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या टायने या हंगामात एकही मॅच खेळील नाही. त्याला एक कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. वाचा- टाय सोबतच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणारे केन रिचर्डसन आणि एडम झम्पा यांनी देखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा नाथन कूल्टर नाइलने मात्र आता घरी जाताना धोका पत्करण्यापेक्षा बायो बबलमध्ये राहणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xsHjKk
No comments:
Post a Comment